कळंब – येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ.अर्चना मुखेडकर यांच्या हस्ते शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक व समाजकार्याची कृतज्ञतेने आठवण करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील महान कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी