February 26, 2026

एनएमएमएस परीक्षेत ज्ञानोद्योग विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी; १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सत्कार

  • येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित ज्ञानोद्योग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पहार व शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचेही मनःपूर्वक स्वागत केले.
    विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन करणारे एस.व्ही.गट्टूवार यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.तसेच इतर विषय शिक्षकांचेही यशामध्ये मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करत त्यांचे कौतुक करण्यात आले.
    एनएमएमएस परीक्षेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
    कु.प्रतिमा सुखदेव गायके,मयुरी मारूती बारकुल,गौरी रामकृष्ण पवार, राजनंदिनी सागर उंबरदंड, तनुजा उमेश बेडके,श्रावणी रामहारी सानप,श्रेया कृष्णा बारकुल,अमृता अण्णासाहेब दगडे,समृद्धी नानासाहेब ओव्हाळ,संध्या चंदाजी पवार, अनुष्का समाधान कांबळे,वैष्णवी परमेश्वर गुंजाळ,अक्षरा शितल पायाळे,पायल बालाजी काळे, जान्हवी सतिश पौळ व चि. गजानन शिवकुमार येवारे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल पाटील होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप पेजगुडे यांनी केले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमर बारकुल यांनी मानले.
    या यशामुळे विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!