कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा शाळेने यावर्षीच्या एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.या परीक्षेत ज्ञानेश्वरी विकास धावडे,संग्राम लक्ष्मण वायकर, गणेश सावंत व साक्षी अतुल शिंदे हे चार विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक व शिवव्याख्याते महादेव खराटे,माजी मुख्याध्यापक ऋषिकुमार साबळे तसेच विज्ञान शिक्षिका शिवनंदा स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.शिक्षकांच्या परिश्रमपूर्वक मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे हे दैदीप्यमान यश संपादन झाले आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,सहशिक्षक तुकाराम कराळे,बलभीम राऊत,स्वयंसेवक बापू हगारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजश्री वायसे, समिती सदस्य,पालक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अधिक दृढ झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी