February 24, 2026

राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कळंबमध्ये अभिवादन

  • कळंब – स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित करणाऱ्या प्रत्येक संतांचे विचार आचरणात आणणे हेच त्यांच्या जयंतीचे खरे औचित्य आहे, असे प्रतिपादन प्रतीक गायकवाड यांनी केले.
    लालबहादुर शास्त्री नगर, पुनर्वसन कळंब येथील महादेव मंदिर येथे संत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोमवार (ता.२३) उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सुनंदा कापसे, माजी नगराध्यक्ष बबन वाघमारे तसेच सर्व नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी नगराध्यक्ष सुनंदा कापसे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, नगरसेवक अतुल कवडे, शीतलकुमार चोंदे,आशा भवर, हर्षद अंबुरे,अर्चना मोरे,ज्योती हरकर,जमील खाटिक,रोहन पारख,वनमाला वाघमारे,अमर चाऊस,रुकसाना बागवान,शाला पवार,सागर मुंढे,योजना वाघमारे, स्वीकृत नगरसेवक संजय मुंदडा, प्रशांत लोमटे,माजी नगरसेविका आश्विनी शिंदे,व्यावसायिक कैलास राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन ॲड.निलेश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अनंत वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमास शहरातील विविध समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!