कळंब–बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘सा.साक्षी पावनज्योत’ या साप्ताहिक वृत्तपत्राने आपल्या कार्याचा विस्तार करत विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने अभ्यासू व परखड व्यक्तिमत्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या प्रभावी लेखणीतून साकारलेले हे वृत्तपत्र सामाजिक,शैक्षणिक व लोकहिताच्या प्रश्नांवर भक्कम भूमिका मांडत आहे. कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या ‘सा.साक्षी पावनज्योत’च्या विशेष प्रतिनिधी म्हणून राजेंद्र बारगुले यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांना कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते अधिकृत ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील वंचित,शोषित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका अधिक सक्षमपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तर व्यावसायिक शिवराज पौळ यांना बाबा नगर प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नागरिक मधुकर बारगुले यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे,असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास गजानन बारगुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.उपस्थितांनी नव्या प्रतिनिधींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘सा.साक्षी पावनज्योत’ हे वृत्तपत्र बहुजनांच्या न्याय हक्कासाठी,शिक्षण प्रसारासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असून,नव्या नियुक्त्यांमुळे वृत्तपत्राची ताकद अधिक वाढणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
शिवजयंतीनिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांना बंधूशोक
कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी येथे ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा