मराठवाड्यातील लढवय्या नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी
मुंबई – भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आजाद (भाई) आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ कांबळे यांच्या हस्ते विनोद कोल्हे यांना महाराष्ट्र राज्य संघटक पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. विनोद कोल्हे यांनी संघटनेत मराठवाडा संघटक म्हणून कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत मराठवाडा उपाध्यक्ष आणि पुढे मराठवाडा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. मराठवाडा अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात संघटन मजबूत करत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये घटनास्थळी जाऊन संघर्ष उभारण्याची त्यांची कार्यशैली कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणादायी मानली जाते.दोन वर्षांपूर्वी समाजहिताच्या आंदोलनात सहभागी असताना पोलीस प्रशासनाने त्यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्या प्रकरणात त्यांनी १५ दिवस कारावासही भोगला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण व लढाऊ कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
More Stories
शिवसेना महायुतीचा धाराशिवमध्ये ऐतिहासिक विजय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजित पिंगळे यांचे अभिनंदन .
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला