कळंब– ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दि.२९ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी झालेल्या या कार्यक्रमात विद्याभवन हायस्कूल, कळंब येथील मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, उपसचिव गव्हाणे,संचालक डॉ.संजय कांबळे,प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड