कळंब – भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना शरद यादव (सहायक संचालक,भाषा संचालनालय, मंत्रालय,मुंबई)) म्हणाले,मराठी भाषा प्राचीन असून तिच्या इतिहासासोबत भौगोलिक क्षेत्र सामाजिक व सांस्कृतिक परंपरा यांचाही विकास होतो.भाषा संस्कृती रुजविण्याचे काम करते, पुढील पिढीस हा वारसा जतन करण्याचे सामाजिक भान आणून देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरतो. शासकीय आणि विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.त्यामधून मराठी भाषा प्रगल्भ असून तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महाराष्ट्र शासनाने ३६ जिल्ह्यात बोलींच्या जागर आयोजित करण्यात आला आहे, याचाच एक भाग म्हणून मोहेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय बोलीचा जागर हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रारंभी भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेच्या या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात बोली जगवा,बोली वाचवा,भाषा वाचवा, संस्कृती टिकवा,मी मराठी माझी मराठी या जयघोषात काढण्यात आली.यामध्ये शिवप्रसाद शर्मा व राज सरवदे यांनी महाराष्ट्रीयन लोककला लावणी,वाघ्या मुरळी, वेशभूषा व शाहीर बंडू खराटे यांनी बोलीभाषेवर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे सुरुवात महाराष्ट्र गीताने पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उद्घाटन ज्ञान प्रसार मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदगीरी बोली अभ्यासक प्रसाद कुमठेकर दखनी बोली मिर्झा बेग,डी.के.शेख तसेच बोली कलावंत अनंत कदम,हनुमंत म्हेत्रे यांनी उदगिरी बोलीचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले. याप्रसंगी शासनाच्या वतीने डॉ.आनंद गांगण (अनुवादक, मंत्रालय) यांनी मराठवाडा,विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच चांदा ते बांद्यापर्यंत भाषा संवर्धनाची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.त्यासाठी निश्चितच शासनाची सहकार्याची भूमिका असल्याचे विशद केले. व्यासपीठावर महेश लगड (अनुवादक,मंत्रालय), दिलीप लादे, (वरीष्ठ लिपिक, मंत्रालय) संचालक डॉ.डी.एस.जाधव, ज्येष्ठ कवी रमेश बोर्डेकर, डॉ.संजय कांबळे (अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांना बोलीभाषा विषयक,आदर्श मराठी व्याकरण लेखन सारखे ग्रंथभेट व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल डॉ.अनिल फाटक व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी विद्याभवन हायस्कूल, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच राहुल देशमुख, हभप महादेव महाराज आडसूळ, सोपान पवार,महादेव गपाट,संजय मोरे, डॉ.डी.एन.चिंते, डॉ.के.डबलु. पावडे, प्रा.बालाजी वाघमारे आदींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद शिंदे,संतोष मोरे,उमेश साळुंखे,आदित्य मडके,संदीप सूर्यवंशी व भारत शेळके यांनी सहकार्य केले.प्रास्ताविक डॉ.दादाराव गुंडरे,सूत्रसंचालन बोलींचा जागर कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी तर आभार उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव यांनी मांडले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व भाषाप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार