March 26, 2026

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा येथे गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे, चिलवंत राजाभाऊ,धनंजय परजणे,ज्ञानोबा टोपे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याचा व मूल्याधिष्ठित शिक्षणाचा आदर्श विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला.कार्यक्रम शांत व भक्तिमय वातावरणात पार पडला. 
error: Content is protected !!