मोहा — गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सतीश कानगुडे,विष्णुतात्या मडके, सूर्यकांत गुंगे,जनार्दन भामरे, संजय आडणे,डी.बी.मडके, अशोक राऊत,नीता सोनवणे,प्रा. शेखर गिरी,प्रा.प्रतिभा सावंत,प्रा. देवदत्त पाटील,मंगलदास पवार, शैलेश गुरव,ज्योतिराम सोनके, दिगांबर शिंदे,परमेश्वर पवार, प्रथमेश साडेकर यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा उपस्थितांनी यावेळी गौरवपूर्वक उल्लेख केला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन