March 26, 2026

आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक कार्यास व विचारांना अभिवादन केले. यावेळी सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी शिक्षक उपस्थित होते.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.कार्यक्रम शांत, सुसंस्कृत वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!