मोहा – मराठवाड्यात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाच्या माध्यमातून विविध ठिकाणी शाळा,विद्यालये व महाविद्यालयांच्या रूपाने दर्जेदार शिक्षणाची चळवळ उभी राहिली आहे.या कार्यामागे संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांनी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दि.१२ जानेवारी २०२६,सोमवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा विशेष अंक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन