September 23, 2026

शेतकरी आणि युवकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडणाऱ्या हनुमंत मडके यांचा सन्मान

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शिक्षण व उद्योगाधिष्ठित समाजनिर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके हे सातत्याने कार्यरत आहेत.परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे,या हेतूने त्यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अग्रो इंडस्ट्रीज,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्टील कारखाना यशस्वीरीत्या उभारले आहेत.त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वरूप दाळ मिल,मोहा येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.
    या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर दि.१२ जानेवारी २०२६ रोजी चेअरमन हनुमंत मडके यांच्या वाढदिवसानिमित्त सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
    या वेळी मुख्य संपादक सुभाष घोडके यांच्या हस्ते हनुमंत मडके यांना शाल,पुष्पहार व साक्षी पावनज्योतचा अंक देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
    या प्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके तसेच उद्योग समूहातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!