मोहा – दि.१ जानेवारी २०२६ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.देवदत्त पाटील यांनी शिक्षण महर्षींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभागप्रमुख प्रा. सुनील साबळे,तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून संस्थापकांच्या कार्याची आठवण ठेवत शिक्षण क्षेत्रातील आदर्श परंपरा जोपासण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन