September 20, 2026

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात ‘शिक्षण महर्षींना अभिवादन; प्रेरणादायी नववर्षाची सुरुवात

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय, मोहा येथे संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा) पाटील यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,श्रीमती उषा पांचाळ, धनंजय परजने,ज्ञानोबा टोपे यांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमातून संस्थापकांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा जोपासण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!