February 8, 2026

ज्ञानोद्योग विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली

  • येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.६ डिसेंबर २०२५,शनिवार रोजी ज्ञानोद्योग विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.हे पूजन शाळेचे प्राचार्य व मुख्याध्यापक सुनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    या दिनानिमित्त शाळेच्या वतीने निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थी यशोदिप संतोष कांबळे,यशराज अशोक कसबे,अनुजा ओव्हाळ,जान्हवी वाघमारे,ईश्वरी बारकुल,समृध्दी ओव्हाळ यांनी प्रभावी भाषण व गीत प्रस्तुतीतून डॉ.आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले.
    मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्ष,तत्त्वज्ञान व यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच श्रीमती सिना सिरसाट यांनी आपल्या मनोगतातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचे सामाजिक, आर्थिक,राजकीय व शैक्षणिक योगदान स्पष्ट करून विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक संदेश दिला.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप मोरे ईटकुरकर यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.अमर बारकुल यांनी मानले.
error: Content is protected !!