मोहा – ज्येष्ठ समाजवादी नेते, राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष तसेच थोर विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे दि.२ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले.त्यांच्या निधनाने समाजकार्य व राष्ट्रसेवेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे पन्नालाल सुराणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांनी सुराणा यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या समाजहिताच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा.सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन