गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,बुद्धविहार तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच अशोक मस्के,महादेव जाधव,शंकर मुंडे, गुलचंद हिंगे,फकीर विधाते,सतीश मस्के,शिवाजी मिसाळ,सुरेश मुंडे, बाळू जाधव,अक्षय मुंडे,विश्वनाथ सुरवसे,दादा जाधव,भास्कर जाधव,कालिंदा मस्के,राजश्री मस्के,शोभा विधाते,पूजा जाधव, शोभा जाधव,जलसा जाधव, तसेच मुख्याध्यापक कनाकवाड हनमंलू,कदम मनिषा,संजय भालेराव,गोविंद गोरे,अनिता आनेराव,वसंत इंगळे,वैशाली बांगर,पौर्णिमा मुधोळकर,इतर शिक्षक-शिक्षिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नमन करत सामाजिक समता,बंधुता आणि प्रगतिशीलतेचा संदेश जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी