कळंब – पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी आपल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक योगदानाचा आदर्शवत उपक्रम राबवत आनंदाच्या क्षणांना अधिक अर्थपूर्ण बनवले. संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय,कळंब येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट व पोषक भोजन वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि समाधान झळकत होते. त्याचबरोबर कळंब उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ केली. या उपक्रमाचे आयोजन पर्याय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. विलास गोडगे,भिकाजी जाधव, विकास कुदळे,बालाजी शेंडगे यांनी विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगावचे सचिव शहाजी चव्हाण,शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, विशेष शिक्षक अश्रुबा कोठावळे, सुनिता गुंड,सुनंदा गायकवाड तसेच शिक्षक गणेश फरताडे उपस्थित होते. विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या स्वादिष्ट भोजनामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शालेय वातावरण अधिक आनंददायी व प्रेरणादायी बनते, असे मत व्यक्त केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी