धाराशिव (जिमाका) – राज्य निवडणूक आयोगातर्फे नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच ४ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती,वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून व्यापक कारवाई राबविण्यात येत आहे.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य,मुंबई तसेच सहआयुक्त (अं. व द.),विभागीय उपआयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार ४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील कारवाईत एकूण २२२ गुन्हे नोंदवून २२३ आरोपींना अटक करण्यात आली.या मोहीमेत १३ वाहने जप्त करण्यात आली असून देशी दारू ३६७.५९ ब.लि.,विदेशी दारू २४९.१८ ब.लि.,बिअर २३.४ ब.लि., अवैध हातभट्टी ६४९३ ब.लि., रसायन ५८,७५० ब.लि.आणि ताडी २२४८ ब.लि.असा एकूण ५७ लक्ष ३६ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हॉटेल्स आणि धाब्यांवरील तपासणी मोहिमेत ४६ गुन्हे नोंदवून,५६ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एका वाहनासह ९,०४,८५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत १० गुन्हे नोंद,८ आरोपी अटक तसेच ८,३४० ब.लि. अवैध दारू (किंमत ३,७१,३०० रुपये) जप्त झाली. विभागीय उपआयुक्त,छत्रपती संभाजीनगर व धाराशिव उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत १० गुन्हे,१० आरोपी अटक तसेच ९९.३ ब.लि.अवैध दारू (किंमत ३४,०२५ रुपये) जप्त करण्यात आली. नगरपरिषदनिहाय आचारसंहितेदरम्यान अवैध मद्यविरोधातील केलेली कारवाई पुढीलप्रमाणे आहे. धाराशिव : २७ गुन्हे, ३२ आरोपी अटक,४ वाहने जप्त, ५७०८.७९ ब.लि. (मुद्देमाल १४,९५,६४० रु.), कळंब : ३ गुन्हे, ३ आरोपी, ७७० ब.लि. (३४,००० रु.),भूम : ८ गुन्हे, ८ आरोपी, १९३३.४४ ब.लि. (९८,२४० रु.),परंडा : २ गुन्हे,२ आरोपी, ७८.६४ ब.लि. (६५९० रु.), तुळजापूर : ५ गुन्हे,५ आरोपी,१ वाहन जप्त (मुद्देमाल १,११,२६० रु.) नळदुर्ग : २ गुन्हे,२ आरोपी,१५५ ब.लि. (१५,५०० रु.),मुरुम : ४ गुन्हे, ४ आरोपी, २२७.२ ब.लि.(२७,७०० रु.),उमरगा : ८ गुन्हे, ८ आरोपी, ३८१.८ ब.लि.(३७,८०० रु.) एकूण जिल्हा : ५९ गुन्हे, ६४ आरोपी,५ वाहने जप्त,९,६९०.८७ ब.लि.अवैध मद्य,एकूण मुद्देमाल किंमत १८ लक्ष २५ हजार ७३० रुपये आहे. ४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या या मोठ्या मोहिमेत २२२ गुन्हे,२२३ आरोपी अटक,१३ वाहने जप्त, तसेच ५७ लक्ष ३६ हजार ६७५ रुपये किंमतीचा अवैध मद्यमाल जप्त झाल्याची माहिती अधीक्षक,उत्पादन शुल्क यांनी दिली. नागरिकांनी अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक,विक्री किंवा हॉटेल/ढाब्यांमधील बेकायदेशीर विक्रीबाबत माहिती असल्यास टोल-फ्री : १८००२३३९९९९ अथवा व्हॉट्सअॅप : ८४२२००११३३ वर कळवावी.माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राखले जाईल,असेही राज्य उत्पादन शुल्क,धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांनी स्पष्ट केले.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य