पुणे – एबीव्हीपीचे संस्थापक डीडोळकर यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचे नुकतेच यूजीसीने शासकीय आदेश दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य या आदेशाची विरोधात कुलगुरूंना निवेदन देवून निषेध केला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, या देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये समतेचा राज्य निर्माण करणाऱ्या क्रांतिकारी,शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व काम करणाऱ्या महापुरुषांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारख्या महापुरुषांची जयंती डावलून कोणत्याही तथाकथित सामाजिक नेते यांचा जयघोष होणार असेल तर या देशांमधील क्रांतिकारी बहुजनांचे नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात प्रा.अंजलीताई आंबेडकर ,सावंत व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य कदापी शांत बसणार नाही. डीडोळकर यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा शासकिय, शैक्षणिक आवारात प्रयत्न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार अशा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव जानवी शेलार, माजी प्रसिद्ध प्रमुख अक्षय गोटेगावकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ जगताप, कौशल जळकोटकर, सुरज शेवाळकर, सिनेटचे माजी उमेदवार राहुल भाऊ ससाणे इत्यादी उपस्थित होते
More Stories
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर