धाराशिव(जिमाका):- प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी बागायत आणि रब्बी ज्वारी जिरायत पिकासाठी 30 नोव्हेंबर होती. मागील काहीं दिवसापासून पिक विमा पोर्टलवर 7/12 च्या डाटाची पडताळणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांनतर मागील तीन दिवसापासून पिक विमा पोर्टल अत्यंत संथ गतीने चालत असल्याने शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचा पिक विमा भरता आला नाही. काहीं शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज अनपेडमध्ये दिसुन येत होते. या अडचणीची शासनाने दखल घेऊन रब्बी ज्वारी पिकासाठी पिक विमा भरण्यास 5 डिसेंबर 2023 मुदत वाढ दिली आहे. शेतकरी रब्बी ज्वारी पिकाचा विमा हप्ता 5 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज भरावेत. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. परंतु रब्बी ज्वारी या पिकाचा विमा उतरावया राहीलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पिक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर 5 डिसेंबर 2023 रोजी विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे. पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
More Stories
शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज पालखीचे आगमन व जल्लोषात स्वागत
मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा