उमरगा – तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानी शाहू गोविंद सार्वजनिक वाचनालय,नाईचाकूर या संस्थेने समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्याची अखंड परंपरा गेली तेवीस वर्षे जपली आहे. वाचनालयाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचक्रोशीतील शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० भूमिपुत्रांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये विशेष सत्कारमूर्ती म्हणून प्रा.तानाजी भगवान पवार यांचा सन्मान करण्यात आला.त्यांनी आपल्या नातीला स्वतःची किडनी देऊन तिला नवजीवन दिले.या त्यागमूर्ती भूमिपुत्राचा सत्कार करताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच चंद्रकांत स्वामी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ.भागीरथी भरत पवार,डॉ.निवेदिता लिंबराज सोमवंशी, इंजी.बाबरे,उमरगा ग्रामीण भाजप तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रघुनाथ माने,काँग्रेस सेवा दल जिल्हा उपाध्यक्ष गोविंद माधवराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सहसचिव हरिदास बाबळसुरे यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.हणमंत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल गुणवंत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी — किशोर रावसाहेब पवार,प्रा.रूपमती सनातन,शिवाजी दादाराव पवार,प्रकाश पवार यांनी परिश्रम घेतले.
More Stories
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा
संप्रदायासोबत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहावी – आकांक्षा चौगुले
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!