March 26, 2026

कळंब शहरात लक्ष्मीपूजनाचा थाट

  • ✨ विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळली बाजारपेठ
  • कळंब ( माधवसिंग राजपूत) –
    दिवाळीच्या पारंपरिक उत्साहात कळंब शहरातील बाजारपेठ सोनसळी उजेडाने झळकली. व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन थाटात साजरे करत आपापल्या दुकानांची स्वच्छता,आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली होती. लक्ष्मी-कुबेर प्रतिमांचे पूजन, वहीपूजन आणि प्रसाद वाटपाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
    व्यापाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
    या पूजनात व्यापारी,महिला आणि मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली.घराघरात लक्ष्मीपूजनाची आरास,फुलांच्या तोरणांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने सजविलेली होती.जैन धर्मीय व्यापाऱ्यांनी भगवान महावीर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीपप्रज्वलन व वहीपूजन करून परंपरा जपली.
    यावर्षी पूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५.४३ ते रात्री ८.१३ असा होता.
  • 🏦 बँका व पतसंस्थांमध्येही पूजनाचा जल्लोष
    कळंब येथील एनसाई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत लक्ष्मीपूजन मोठ्या थाटात पार पडले.या वेळी व्यापारी कर्सन पटेल,शिवराज पाटील,शाखाधिकारी काशीनाथ पालकर,शिवलिंग महाजन,गणेश इंगळे,अंकुश सुर्यवंशी,गणेश अभंग,सुभाष फाटक,पत्रकार राजे सावंत, सागर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • 📚 ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व चेअरमन हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट शाखा कळंब येथे व्यवस्थापक फुलचंद मडके यांनी लक्ष्मीपूजन व ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.या वेळी कर्मचारी राहुल मडके,योगेश मुळे,अनिकेत मडके,सोमनाथ काथमांडे, अडसूळ आदी उपस्थित होते.
  • 💫 शुभेच्छांचा वर्षाव व समृद्धीची कामना
    या सर्व कार्यक्रमात व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांनी एकमेकांना सुख, शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
    संध्याकाळी फटाक्यांच्या आतषबाजीने आणि पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण कळंब बाजारपेठ झगमगून गेली.
error: Content is protected !!