March 26, 2026

जातिभेद न करता निस्वार्थ भावनेने जो समाजाची सेवा करतो, तोच खरा समाजसेवक –ॲड.अण्णाराव पाटील

  • पोलीस मित्र सोशल असोसिएशन पुरस्कार सोहळा संपन्न

  • लातूर – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात डॉक्टर, वकील,इंजिनिअर,समाजसेवक, शिक्षक,शेती आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले गेले.यंदा जवळपास ३९ पुरस्कार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.अण्णाराव पाटील (विधीमंडळाचे अध्यक्ष),लातूर खासदार डॉ.शिवाजी काळगे, सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,राजेंद्र बारगुले,सुशिल चिकटे आणि सिद्धार्थ कवठेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन सुफी सय्यद शमशोद्दीन यांनी केले.
    यावेळी ॲड.अण्णाराव पाटील म्हणाले की,रंजल्या गांजल्यात ज्याला देव दिसतो व जातिभेद न करता निस्वार्थ भावनेने जो समाजाची सेवा करतो तोच खरा समाजसेवक,आणि हा समाजसेवक मी सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या माध्यमातून पाहतोय.
    सुफी सय्यद शमशोद्दीन सारखा समाजसेवक विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून पुरस्कार देतो, हे सोपे काम नाही;त्यामागे समाजजागृतीचे वेड असावे लागतेतर खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी भाषणात सांगितले की,मानवाने जीवन जगताना जात-पात भेदभाव बाजूला ठेवून समाजकार्य करावे.तरच ती व्यक्ती पुरस्कारासाठी योग्य ठरते.

  • सन्मानित मान्यवरांमध्ये डॉ. विकास निलंगेकर,डॉ.रामलिंग जावळे,व्यंकट कव्हाळे,शितल बलदोटा,राजकुमार कज्जेवाड, संजय राजुळे,मनोज सुर्यवंशी, बिभीषण ढगे,राजेंद्र क्षीरसागर, विशाल शिंदे,शिवाजी आळणे, विश्वनाथ क्षिरसागर,नितीन वाघमारे,डॉ.रामराव पवार, रामकृष्ण चलवाढ,प्रा.बळीराम पवार,नानासाहेब पाखरे,राहुल बनसोडे,दयानंद कांबळे,ज्ञानेश्वरी बटवाड,प्रा.शिवाजी गाडे,अंसारी शब्बीर,प्रा.अजय मस्के पाटील, डॉ.सविता भारती,ॲड.गणेश कांबळे,बाळासाहेब मधाळे,अर्जुन वाघमारे,डॉ.डी.एन.श्रंगारे,दयानंद काळे,ॲड.लक्ष्मण शिंदे,बापू खोसे,महादेव खराटे,रंजना हासुरे, पुजा भोसले-घाडगे,दिपमाला तुपकर,संतोष वीर,महेबुब शेख, अभिजीत बनसोडे,वसीम सय्यद, दयानंद कदम,शेख गुलाम,पवन कांबळे,अनिरुद्ध कुलकर्णी, सदानंद मोरे,प्रदीप कबाडे, चंद्रकांत शिंगे-बनसोडे,देवराव जोगदंडे,गौतम गायकवाड इत्यादींचा समावेश होता.
    कार्यक्रमाच्या शेवटी बंडु ताटे यांनी आभार मानले,आणि दिवाळी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.

error: Content is protected !!