धाराशिव – शाळा,पारधी वस्ती, महादेव नगर येथे धाराशिव जिल्हा जैन समाज संघटनेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना किराणा किट व औषधी किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्लासजी चाकवते (धाराशिव),सुहास हिंदाणे,हर्षद आंबुरे (कळंब),निशिकांत संगवे (कळंब) आणि अतुल कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षांनी आपल्या मनोगतात समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक दराडे ए. डी.,शिंदे डी.व्ही.,श्रीमती डांगे एम.पी.यांनी परिश्रम घेतले तर होगले एच.एफ.यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. या वेळी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजभावनेचा सुंदर प्रत्यय घडविला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी