कळंब – अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या महिला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण पुन्हा उजळवण्याचे कार्य पुणे येथील पुण्यधाम ट्रस्ट आणि पर्याय सामाजिक संस्था हसेगाव (के) यांनी संयुक्तपणे केले आहे.पर्यायचे कार्यवाहक विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पुण्यधाम ट्रस्टच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील १०० महिला शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हरभरा बियाण्यांच्या पिशव्या, तसेच ३०० महिला शेतकऱ्यांना साड्या व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम दि.१६ ऑक्टोबर रोजी कळंब तालुक्यातील आथर्डी गाव व पर्याय कॅम्पस येथे संपन्न झाला.या उपक्रमात आढाळा, आडसूळवाडी,आथर्डी,खडकी, लोहटा पूर्व या गावांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशासाठी पर्याय संस्थेच्या सौ.अनिताताई तोडकर,विलास गोडगे,ऋषिकेश तोडकर,अनिकेत तोडकर तसेच पुण्यधाम ट्रस्टचे पदाधिकारी यांनी मनापासून प्रयत्न केले.कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात बालाजी शेंडगे,सुनंदा खराटे,वैभव चोंदे,विकास कुदळे, प्रमिला राख,परमेश्वर गवारे,वंदना चिलवंत,अशोक शिंदे,दिगंबर लडके या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
🛑 महिला शेतकऱ्यांचे मनोगत –
श्रीमती मंदाबाई गवारे (आथर्डी) –“पूरानंतर शेतात काहीच उरलं नव्हतं. रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियाणं मिळालं म्हणून पुन्हा शेती सुरू करता येईल,ही मोठी मदत आहे.”
सौ.प्रमिलाताई राख (आढाळा) –“थंडीची चाहूल लागली आहे. साडी आणि ब्लँकेट मिळाल्याने उब मिळाली,मनालाही दिलासा मिळाला.पुण्यधाम ट्रस्ट आणि पर्याय संस्थेचं मनापासून आभार.”
श्रीमती सुनंदा खराटे (लोहटा पूर्व) – “या कठीण काळात आमच्यासाठी कोणी तरी विचार करतंय हीच मोठी गोष्ट आहे.ही मदत आमच्यासाठी नव्या हंगामाची नवी सुरुवात ठरेल.”

More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव