मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकर्षक व मोहक असे आकाशकंदील बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये आदिती मडके,सिमरन पठाण,जोया शेख,वैष्णवी कानडे, प्रतिक्षा कोष्टी,अंजली कोष्टी, अस्मिता मंडाळे,जान्हवी लोकरे, वैष्णवी वीर,समृद्धी लोकरे, अंकिता मते या विद्यार्थिनींनी विविध आकारांचे तसेच आकर्षक रंगांचे लक्षवेधी आकाशकंदील अतिशय कल्पकतेने तयार केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सहशिक्षिका श्रीमती उषा पांचाळ,श्रीमती नीता सोनवणे,प्रा. प्रतिभा सावंत यांनी केले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश(भाऊ) मोहेकर तसेच पर्यवेक्षक सतीश कानगुडे सर व उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांनी या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांचे कौतुक केले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन