कळंब – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सोलापूर जिल्हा समिती यांच्या वतीने कळंब येथील विद्याभवन हायस्कूलमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मराठी विभाग प्रमुख आणि नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली — (अ) पाचवी ते सातवी या गटात 41 विद्यार्थी तर (ब) आठवी ते दहावी या गटात तब्बल 182 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एकूण 223 विद्यार्थ्यांनी या ज्ञानस्पर्धेत भाग घेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमात शिक्षक सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे महत्त्व सांगत अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी लहानपणापासून करण्याचे आवाहन केले. “सध्याच्या स्पर्धात्मक युगात चालू घडामोडी व स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे. मोठे ध्येय ठेवा आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जा,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले. या दोन्ही गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी