समाजसेवा,वैद्यक आणि मानवतेच्या कार्याला मानाचा मुजरा
कळंब – शहरातील प्रतिष्ठित हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ.सचिन धोंडिबा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी दि.१८ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेश चित्र मंदिर रोडवरील पवार हॉस्पिटल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन सा.साक्षी पावनज्योत परिवार व ज्येष्ठ नागरिक संघ,कळंब यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते साप्ताहिकाचा ताज्या अंकाचा प्रतीकात्मक सप्रेम भेटवस्तू म्हणून डॉ.पवार यांना प्रदान करण्यात आला.तर ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव आडसुळ महाराज यांच्या हस्ते डॉ.पवार यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल माने, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, डॉ. गिरीष कुलकर्णी, तसेच सेवानिवृत्त शिक्षक धोंडिबा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय कासार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामदास माने यांनी केले. डॉ.सचिन पवार यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानताना सांगितले की, “रुग्णसेवा हेच माझे धर्मस्थान आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्यवृद्धीसाठी मी अखंडपणे कार्यरत राहणार आहे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवला. डॉ.पवार यांचे सहकारी,रुग्ण,मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत दीर्घायुष्य, यश व निरोगी जीवनाच्या सदिच्छा दिल्या.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड