मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध कार्यक्रमांनी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,पर्यवेक्षक सतीश कानगुडे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.या प्रदर्शनामध्ये कथा,कविता,गझल, कादंबरी,दिवाळी अंक,मासिके, मराठी व्याकरण,इंग्रजी व्याकरण तसेच स्पर्धा परीक्षांची पुस्तके ठेवण्यात आली होती.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अंजली कोष्टी,जय रणदिवे,शिवानी मडके, अंकिता झोरी आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांचा जीवनपट सांगितला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अविनाश मोरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील संघर्ष सांगून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका श्रीमती उषा पांचाळ, श्रीमती नीता सोनवणे,प्रा.देवदत्त पाटील,प्रा.रोहित मोहेकर, सहशिक्षक सतीश मडके, कमलाकर शेवाळे,प्रा.अमित जाधव,प्रा.राहुल भिसे,संजय आडणे,शैलेश गुरव,आर.एन. चिलवंत,अनूप पाटील,अमितकुमार शर्मा,धनंजय परजणे, अंगद आगलावे,ज्ञानोबा टोपे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन