March 26, 2026

विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेत वाचन प्रेरणा दिन साजरा

  • कळंब– ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेत डॉ. ए.पी.जे अब्दुल यांचा १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षक कोळी जे एन यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली तसेच वाचन संस्कृती काळाची गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की सध्याच्या विज्ञान,स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे,थोर पुरुषांचे चरित्र,ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. साने गुरुजी श्यामची आई अशा संस्कारमय पुस्तकाचे वाचन करावे.विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान घेण्याची ओढ प्रचंड इच्छाशक्ती वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे.ग्रंथ हे माणसाला ज्ञान समृद्ध करतात. वाचनामुळे स्मरणशक्ती,एकाग्रता वाढते.छोट्या छोट्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक सुशील कुमार तीर्थकर, आप्पासाहेब वाघमोडे,ग्रंथपाल प्रशांत गुरव,सुरज मडके,रवी कोल्हे,विशाल पवार व उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सोपान पवार यांनी केले तर आभार संजय मडके यांनी मानले.
error: Content is protected !!