February 8, 2026

स्वयंसहाय्यता गटांचे दीपोत्सवी प्रदर्शन ठरले आकर्षणाचे केंद्र — महिलांनी दाखवला आत्मनिर्भरतेचा मार्ग!

  • कळंब – उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती कळंब यांच्या वतीने दीपावली महोत्सव 2025 दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
    या महोत्सवात कळंब तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल हस्तकला वस्तू, कलाकुसर उत्पादने आणि सुकामेव्याचे आकर्षक प्रदर्शन व विक्री आज कळंब शहरातील शिवाजी महाराज चौकात पार पडले.
    महोत्सवाचे उद्घाटन नायब तहसीलदार (महसूल) गोकुळ भराडीया यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिलांनी साकारलेली उत्पादने दर्जेदार व आकर्षक आहेत. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटांना आवश्यक ती मदत दिली जाईल.तसेच महिलांनी विविध शासकीय योजनांसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत,”असे आवाहन त्यांनी केले.
    यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी शहरातील नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रदर्शनास भेट देऊन स्थानिक उत्पादक महिलांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन केले.
    कार्यक्रमास तालुका व्यवस्थापक अभिजीत पडवळ,पवन पवार, प्रभाग समन्वयक अमोल सालपे, सूर्यकांत खेडकर,खंडू बर्डे,मकरंद कुलकर्णी,अनिता बेडके,विनोद घोळवे,पांडुरंग भुजबळ,CLF मॅनेजर सपना सुरवसे,तसेच CRP, उपजीविका सखी आणि मोठ्या संख्येने उत्पादक महिला उपस्थित होत्या.
error: Content is protected !!