February 8, 2026

मातृभूमीच्या रक्षणासाठी कार्यरत समाजवीरांचा ‘गौरव कर्तव्याचा’ सत्कार सोहळा लातूरमध्ये

  • लातूर – मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य असल्याचा संदेश देत महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) तर्फे ‘गौरव कर्तव्याचा…! सत्कार सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन रविवार,दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ वा.डॉ.भालचंद्र ब्लड बँक, मध्यवर्ती बसस्थानकच्या मागे, लातूर येथे करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकुर (घुगे) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत ॲड.आण्णाराव पाटील (संस्थापक,महाराष्ट्र विकास आघाडी)राहणार असून,विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे (भा.पो.से) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना (आ) यांची उपस्थिती लाभणार आहे.
    यावेळी खासदार डॉ.शिवाजीराव काळगे,वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.मंजुषाताई राजेनिंबाळकर,ज्येष्ठ पत्रकार सुभाष द.घोडके,लेखक-विचारवंत नागोराव कुंभार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशिल चिकटे,तसेच पत्रकार राजेंद्र बारगुले (व्हॉइस ऑफ मिडिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.या वेळी विविध समाजसेवक,पोलीस मित्र, आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
    या कार्यक्रमाद्वारे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
error: Content is protected !!