कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा ता.कळंब येथे दि.२५ सप्टेंबर २०२५ वार गुरुवार रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे, पर्यवेक्षक सतीश कानगुडे व उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे उपस्थित होते. गुरुजींनी नेहमीच “शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानार्जन नव्हे तर चारित्र्य व समाजभान निर्माण करणारी प्रक्रिया आहे” हा विचार मांडला होता.त्यांच्या मते,शाळा ही केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचे संस्कार घडवणारी पवित्र जागा असावी.त्यांचा हा शैक्षणिक दृष्टिकोन आजही शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजींच्या स्मृतींना अभिवादन केले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन