February 8, 2026

महात्मा गांधी उर्दू स्कूलने ढोकीचा मान उंचावला

  • शेख जवेरिया फेरोज प्रथम क्रमांकाने सन्मानित
  • धाराशिव – महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत महात्मा गांधी उर्दू स्कूल,ढोकी येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी शेख जवेरिया फेरोज हिने प्रथम क्रमांक पटकावत ढोकी गावाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धाराशिव येथे तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
    लहान वयातच निबंधलेखनाच्या माध्यमातून आपली लेखनकला आणि विचारशक्ती सादर करून जवेरियाने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकवर्गाचे मोलाचे प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण मेहनत या सर्व घटकांचा मोठा वाटा आहे.
    या विजयाबद्दल शेख जवेरिया फेरोज,तिचे आई-वडील तसेच महात्मा गांधी उर्दू स्कूल ढोकी येथील सर्व शिक्षकवर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.तिच्या या कामगिरीमुळे उर्दू शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा आणि दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!