February 8, 2026

स्वच्छतेतून समाज जागृतीचा आदर्श उपक्रम

  • डिकसळ येथे स्वच्छता पंधरवडा उत्साहात
  • कळंब – आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब यांच्या वतीने दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी डिकसळ गावात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.
    या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस अतिश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
    स्वच्छता उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत परिसर,हनुमान मंदिर, वस्ती,संत बोधले महाराज शाळा तसेच डिकसळ गावातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.संस्थेचे निदेशक व एकूण ६८ प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी झाले.
    दि.२ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. तसेच २०१७ पासून “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. त्याच परंपरेनुसार याही वर्षी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
    या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट प्रशिक्षणार्थ्यांमध्ये स्वयंसेवकत्वाची जाणीव निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी दृढ करणे व एकत्रित कार्य करण्याची क्षमता विकसित करणे हे होते. या निमित्ताने ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकमुक्त गावाची गरज व पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे आदींची उपस्थिती होती.
    या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
error: Content is protected !!