धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 202 कारवाया करुन 1,53,850 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुनिता दिपक लोखंडे, वय 40 वर्षे, रा. इंदीरानगर, धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.27.11.2023 रोजी 19.50 वा. सु. इंदीरानगर येथे अंदाजे 3,480 ₹ किंमतीची 58 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)रेणुका प्रशांत तेलंग, वय 23 वर्षे, रा. चिलवडी, ता. जि. धाराशिव या दि.27.11.2023 रोजी 18.30 वा. सु. चिलवडी झोपडपट्टी येथे अंदाजे 3,100 ₹ किंमतीची 50 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 14.10 वा. सु. कळंब पो. ठा.आठवडी बाजार कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पाशा दगडू शेख, वय 35 वर्षे, रा. चोंदे गल्ली कळंब ता.कळंब जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. आठवडी बाजार कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 19.30 ते 19.35 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)इरशाद इलाही तांबोळी, वय 40 वर्षे, रा झोरी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवह सांजा रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 370 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)मैनु मदार तांबोळी, वय 40 वर्षे, रा खिरणी मळा, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.35 वा. सु. आरबीकलेक्शन समोर रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)दादासाहेब रामराव भंडारे, वय 32 वर्षे, रा. कास्ती ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 12.54 वा. सु. आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच 25 एन 1063 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) हरी जनार्दन बोराडे, वय 40 वर्षे, रा.मुंगशी रोफळे कव्हे ता. माढा जि. सोलापूर हे दि.27.11.2023 रोजी 19.03 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 12 व्हीआर 8309 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
तामलवाडी पोलीस ठाणे : तुळजापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- खंडु शंकर काशीद, वय 49 वर्षे यांनी दि.27.11.2023 रोजी 15.40 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुझर क्रं. एम.एच.17 आर 0672 हा बालाजी अमाईन्स कंपनी समोर तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आह.
“ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)खंडु शेषराव लांडगे, वय 30 वर्षे, रा. एकंबी ता. औसा जि. लातुर 2) देवानंद उत्तम कांबळे, वय 48 वर्षे, रा. संभाजीनगर बेंबळी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.27.11.2023 रोजी 11.30 ते 12.30 वा. सु बेंबळी आठवडी बाजार या ठिकाणी रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- हरिश्चंद्र हनुमंत चोपाटे, वय 30 वर्षे, रा. सुर्डी, ता. जि. धाराशिव यांचे अंदाजे 2,50,000₹ किंमतीचे स्वराज ट्रॅक्टर क्र एमएच 45 एएल 9111 हे दि. 14.11.2023 रोजी 15.00 ते दि. 15.11.2023 रोजी 06.00 वा. सु. एमटी वर्कशॉपचे पाठीमागील बाजूस धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हरिश्चंद्र चोपाटे यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- बाबासाहेब उर्फ बॉबीदेओल कांतीलाल पवार, वय 24 वर्षे, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 11.30 वा. सु. येरमाळा चौकाचे उड्डाण पुलाचे पुढे पेट्रोल पंपचे जवह धुळे सोलापूर हायवे रोडवरुन मोटरसायकल एमएच 25 एझेड 0613 हीवर बसून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे- सुनिल धोंडीबा मुंडे, जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 11.30 वा. सु. येरमाळा चौकाचे उड्डाण पुलाचे पुढे पेट्रोल पंपचे जवह धुळे सोलापूर हायवे रोडवरुन स्कुटी क्र एमएच 25 एक्यु 6916 च्या चालकाने त्याचे ताब्यातील स्कुटी ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे बाबासाहेब पवार यांचे मोटरसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या आपघातात आरोपी मयत नामे सुनिल मुंडे हे स्वत: गंभीर जखमी होवून मयत झाले. तर फिर्यादी-बाबासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीचे मोटरसायकल व स्वत:चे स्कुटीचे नुकसान करण्यास कारणाभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाबासाहेब पवार यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304 (अ), 427 सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) प्रशांत घाटशिळे, 2) विशाल सिध्दगणेश, दोघे रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 20.00 वा. सु. जयभवानी टायरवर्कस सिंदफळ शिवार येथे फिर्यादी नामे- आकाश महावीर जाधव, वय 22 वर्षे, रा. रायखेल ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी टॉमीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश जाधव यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अनिल विश्वनाथ लांडगे, 2) श्रीराम अनिल लांडगे, दोघे रा. खोंदला, ता. कळंब 3) विश्वंभर जोगदंड, 4) शुभांगी जोगदंड रा. पिंपळगाव क. ता.वाशी, 5) पदमानंद अंगद भोरे रा. दहिफळ ता. वाशी, 6) श्रीकांत बाबुराव मिटकरी रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 18.00 वा. सु. खोंदला शिवारातील शेतात फिर्यादी नामे- लताबाई बाळासाहेब लांडगे, वय 50 वर्षे, रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव यांचे पती बाळासाहेब लांडगे यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीच्या तुंब्याने मारहाण करुन जखमी केले. तसचे फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, उस, दगडाने मारहाण करुन हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लताबाई लांडगे यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 143, 146, 147, 324, 323, 504, 506भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) हामिद महेबुब शेख/ मुजावर, 2) जावेद हामीद शेख/मुजावर, 3) शबाना हामिद शेख/ मुजावर, 4) जिनत जावेद शेख/ मुजावर सर्व रा. जैतुन बी चाळ एम जी रोड बोरीवली ईस्ट मुंबई ह.मु. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 27.11.2023 रोजी 07.00 ते 08.00 वा. सु. जवळा नि. येथे फिर्यादी नामे- जैनुद्दीन महेबुब मुजावर, वय 65 वर्षे, रा. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना जागेचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस व फिर्यादीचे मुलगा जमीर मुजावर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची पत्नी जुलेखा व सुन आस्मा या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जैनुद्दीन मुजावर यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला