February 8, 2026

शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारात अभिवादन

  • मोहा – दि.१८ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या हस्ते मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा ट्रस्टी रमेश (भाऊ) मोहेकर,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांच्यासह मोहा गावातील प्रतिष्ठित नागरिक जीवनराव मडके व आबासाहेब मडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सतीश मडके यांनी केले.तसेच या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक–शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
    या अभिवादन कार्यक्रमामुळे संस्थापक अध्यक्षांविषयीची कृतज्ञता व प्रेरणाभाव व्यक्त झाला.
error: Content is protected !!