February 9, 2026

गोविंदपूर येथे ग्रामसभा संपन्न

  • गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे सरपंच आशोक मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.यामध्ये खालील विषय मांडण्यात आले.गाव निहाय रस्त्याची यादी तयार करणे,प्रपत्र एक व प्रपत्र दोन नुसार नोंदी घेऊन प्रस्ताव तयार करणे,ग्रामसभेत प्राथमिक यादी ठेवून ठराव घेणे,भुमिअभिलेख विभागामार्फत रस्त्याची सीमांकन करणे,अतिक्रमण झाल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे,गाव नोंदवहीत रस्त्याची नोंद अद्यावत करणे प्रपत्र तीन नुसार,रस्त्यासाठी विशिष्ट क्रमांक निश्चित करणे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवणे व त्याबाबत चर्चा करणे तसेच नाली दुरुस्ती,रस्ता दुरुस्ती,गावात लाईट बल्ब बसवणे आदि विषायावर चर्चा करण्यात आली.
    यावेळ ग्रामसेवक कसबे,तलाठी इंगळे मॅडम,सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,अनिल मुंडे, हिरालाल मुंडे,गुलाब मुंडे,सचिन माळी,धनंजय माळी,सचिन सुरवसे,अक्षय सुरवसे,बशीर शेख, दिपक मुंडे,चंदुलाल मुंडे,महादेव मुंडे,सतिश मस्के,अंगणावाडी सेविका सुमन सुरवसे,धम्मशिला जाधव,सुशाला पाटील,कमल गायकवाड,आश्विनी हिंगे,अर्चना मस्के,आशा कार्यकर्ती राजश्री मस्के,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!