मोहा – ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांना नुकताच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मोहा तर्फे प्रदान करण्यात येणारा “आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक पुरस्कार” प्राप्त झाला.या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मोरे यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य अविनाश मोरे म्हणाले –“हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर सर्व कर्मचाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे.या पुरस्कारामुळे आपल्याला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली असून,ही एक नवी सुरुवात आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले.याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,प्रा.सुनील साबळे यांच्यासह विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन