मोहा (प्रविण कसबे) – कळंब तालुक्यातील मोहा ग्रामपंचायतीत दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सीमा संदीप मडके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपसरपंच बशारत मोमिन, माजी सरपंच बाबासाहेब मडके, सोमनाथ मडके,अनिल मडके, ग्रामपंचायत सदस्य बालाजी मडके,समाधान कसबे, सोसायटीचे संचालक अच्युतराव मडके, हनुमंत मडके,प्रविण कसबे,बाबा कसबे,राहुल कसबे, दत्ता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,आशा कार्यकर्त्या, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात वक्त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हौतात्म्याची आठवण करून दिली व ग्रामस्थांना समाजकल्याण व विकासासाठी प्रेरित केले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शेवटी ग्रामपंचायतीतर्फे आभार मानण्यात आले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन