मोहा –ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात व राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्योतिराम सोनके यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास, शहीदांचे बलिदान व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा परिचय करून दिला. त्यांचा भारदस्त उद्गार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला.
यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांनी उत्तमरीत्या केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक डी.बी मडके,सतीश मडके,प्रा.सुनील साबळे, प्रा. राहुल भिसे, सुर्यकांत गुंगे, जनार्दन भामरे, संजय आडणे, सहशिक्षिका निता सोनवणे, उषा पांचाळ, प्रा. प्रतिभा सावंत आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन