भाट शिरपूरा – दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय,भाट शिरपूरा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वसंत महाविद्यालय, केज (जि. बीड) येथील रसायनशास्त्र विषयाचे प्रा.तुकाराम पाटील,हे दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतरच्या भावी जीवनासाठी त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते. यावेळी सहशिक्षक एस. जी. सूर्यवंशी, एच. ए. पानढवळे, एस. एस. डिकले, बी. व्ही. ओहाळ, चालक व्ही. एम. शिंदे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या मनोगतात प्रा.तुकाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हावे व आपल्या पालकांचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे.” मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी