March 26, 2026

ज्ञानोद्योग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

  • तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुहेरी विजेतेपद – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
  • येरमाळा – कळंब तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा पुढे चालवत दुहेरी विजेतेपद पटकावले.
    दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत १७ वर्ष वयोगट आणि १९ वर्ष वयोगट या दोन्ही गटांमध्ये ज्ञानोद्योग विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार खेळ सादर करत प्रथम क्रमांक मिळवला.या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयातील दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.
    खेळाडूंना यश मिळवून देण्यासाठी क्रीडा शिक्षक चांदणे यांनी विशेष मेहनत घेतली.
  • या ऐतिहासिक यशानंतर ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,कोषाध्यक्ष प्रा.अंकुश पाटील,प्राचार्य सुनील पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
    ज्ञानोद्योग विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम ठेवावी, अशा शुभेच्छा सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या.
error: Content is protected !!