कळंब – वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR),कळंब यांच्या वतीने “ग्रामीण समुदाय समग्र विकास” कार्यक्रमांतर्गत महिला प्रवर्तक प्रशिक्षण व पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी WOTR कार्यालयात पार पडला. या प्रसंगी जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ.उज्वला कवठेकर यांनी किशोरवयीन मुलींचे पोषण व आहार,महिला आरोग्य,मासिक पाळी,वैयक्तिक स्वच्छता आदी विषयांवर मार्गदर्शन केले.महिला प्रवर्तकांनी स्वतःबनवून आणलेले ६५ प्रकारचे पौष्टिक पदार्थ प्रदर्शित केले.या पदार्थांमधील जीवनसत्त्वांची माहितीही प्रवर्तकांनी सादर केली. पुढील कार्ययोजनेत किशोरवयीन मुलींसाठी HB कॅम्प,महिलांचा रान महोत्सव,अंगणवाड्यांमध्ये गोपाळ पंगत व गरोदर-स्तनदा मातांची बैठक यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास WOTR कळंबचे मॅनेजर अनिल वांढेकर,सोशल ऑफिसर प्रियदर्शनी कांबळे यांच्यासह १५ गावांतील महिला प्रवर्तक उपस्थित होत्या.एकूण १८ जणांचा सहभाग नोंदविण्यात आला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन