मोहा – दिनांक ४ सप्टेंबर २०२५, वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश(भाऊ) मोहेकर यांनी गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,सहशिक्षक डी.बी.मडके, सुर्यकांत गुंगे,प्रा.रोहित मोहेकर,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे,कमलाकर शेवाळे,ज्ञानोबा टोपे, विद्यार्थिनी अंकिता झोरी यांच्यासह सर्व शिक्षक–शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमाने संस्थेतील शिक्षक–विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन