मोहा – दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा येथे ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे तसेच पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी व ६ वी या वर्गांसाठी पालक–विचार सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे व ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमात इंग्रजी व मराठी विषय शिक्षक कमलाकर शेवाळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय प्रवेश परीक्षा याविषयी माहिती दिली.तसेच सुंदर हस्ताक्षर,वाचन कौशल्य आणि भाषिक प्रगती कशी साधावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. सहशिक्षिका श्रीमती उषा पांचाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले.त्यांनी गणित व विज्ञान विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी उपयुक्त मार्ग सांगितले. सहशिक्षक राजाभाऊ चिलवंत यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगल्या सवयी जोपासण्याचे महत्त्व स्पष्ट केले. शेवटी प्राचार्य अविनाश मोरे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,विद्यार्थी भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करून सुसंस्कृत नागरिक म्हणून घडावा,यासाठी पालक–शिक्षक–विद्यार्थी यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास धनंजय परजने,अंगद आगलावे,प्रथमेश साडेकर यांच्यासह गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीमती उषा पांचाळ यांनी केले.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन