February 8, 2026

शिक्षक दिन ज्ञान प्रसार विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेने साजरा

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,पर्यवेक्षक सतीश कानगुडे, प्रा.सुनील साबळे,ज्येष्ठ सहशिक्षक डी.बी.मडके,प्रा.विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी आठवीच्या मुलींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
    अंजली मडके,वसुंधरा वीर, वैष्णवी मडके,दीक्षा कसबे, आदिती मडके व सानिका बाराखोते यांनी यामध्ये सहभाग घेतला.
    वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी आपले विचार प्रभावी पद्धतीने मांडले.यामध्ये प्रियंका जाधव,सानिका बाराखोते, आदिती मडके,अंजली मडके, वैष्णवी मडके,प्रतीक्षा कोष्टी, अंजली कोष्टी,दीक्षा कसबे व वसुंधरा वीर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
    सहशिक्षिका नीता सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व वक्त्यांचे कौतुक केले.शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिकांचा विद्यार्थिनींकडून गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर गिरी यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी अंकिता झोरी हिने केले,तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्रुती माळी हिने केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका निता सोनवणे,प्रा. प्रतिभा सावंत,सहशिक्षक सतीश मडके,प्रा.रोहित मोहेकर,प्रा. दिग्विजय पाटील,प्रा.देवदत्त पाटील,प्रा.अमित जाधव,प्रा. राहुल भिसे,अमितकुमार शर्मा, अनूप पाटील,बी.एम.काळे, दिगंबर शिंदे,ज्ञानोबा टोपे व प्रथमेश साडेकर यांनी परिश्रम घेतले.
    या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!