मोहा- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्यावतीने दि. ०१ व ०२ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये “हमारा विद्यालय – हमारा स्वाभिमान” हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प केला. या उपक्रमाद्वारे शाळेतील स्वच्छता,शिस्तबद्धता व हरितमय वातावरण निर्मिती,विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे,राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता,नागरी कर्तव्यांचे पालन यावर भर देण्यात आला.तसेच शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे केंद्र न मानता राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीचे पवित्र स्थान मानण्याचा संकल्प करण्यात आला.पर्यावरण संरक्षण व जीवनमूल्यांची जपणूक हाही या उपक्रमाचा प्रमुख संदेश होता. यावेळी प्रा.देवदत्त पाटील यांनी हिंदीमधील संकल्पाचे वाचन केले व विद्यार्थी–शिक्षकांनी एकत्रितपणे सामूहिक संकल्प घेतला.कार्यक्रमास मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे व पर्यवेक्षक सतीश कानगुडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनील साबळे,धनंजय मडके, नवनाथ करंजकर,सतीश मडके, विठ्ठल जाधव,संजय आडणे, जनार्दन भामरे,रोहित मोहेकर, राहुल भिसे,दिग्विजय पाटील, अमित जाधव,सुर्यकांत गुंगे, मंगलदास पवार,शैलेश गुरव, अशोक राऊत,जोतिराम सोनके, चंद्रशेखर गिरी,अनूप पाटील, अमितकुमार शर्मा,अंगद आगलावे, ज्ञानोबा टोपे,प्रथमेश साडेकर आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन